चिखलठाण-1 ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर-
जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE) – करमाळा तालुक्यातील चिखलठाण ग्रामपंचायतची पंचवार्षिक मुदत डिसेंबर 2022 ला संपली असून सध्या चिखलठाण ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्ती आहे.
दरम्यान निवडणूक पुढील काही महिन्यात लागण्याची शक्यता आहे 2023 निवडणूकीसाठी प्रभाग रचना करण्यात आली आहे. तसेच आरक्षण ही जाहीर झालेले आहे. ही निवडणूक 5 प्रभागांमध्ये होणार असून एकूण 13 जागांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झालेले आहे. दरम्यान चिखलठाण ग्रामपंचायत साठी जनतेतून सरपंच निवड होणार असून सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला (ओपन महिला) साठी आरक्षण जाहीर झालेले आहे.
प्रभाग क्रमांक १- २ जागा
१) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी महिला)- १ जागा
२) सर्वसाधारण पुरुष (ओपन)- १ जागा
प्रभाग क्रमांक २- २ जागा
१) सर्वसाधारण पुरुष (ओपन)- १ जागा
२) सर्वसाधारण महिला (ओपन महिला)- १ जागा
प्रभाग क्रमांक ३- ३ जागा
१) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी महिला)- १ जागा
२) सर्वसाधारण पुरुष (ओपन)- १ जागा
३) सर्वसाधारण महिला (ओपन)- १ जागा
प्रभाग क्रमांक ४- ३ जागा
१) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी पुरुष)- १ जागा
२) सर्वसाधारण पुरुष (ओपन)- १ जागा
३) सर्वसाधारण महिला (ओपन महिला)- १ जागा
प्रभाग क्रमांक ५- ३ जागा
१) अनुसुचित जाती (एस्स्सी पुरुष SC)- १ जागा
२) सर्वसाधारण महिला (ओपन)- २ जागा
चिखलठाण ग्रामपंचायत ची मुदत डिसेंबर 2022 मध्ये संपली असून येत्या काही महिन्यांत ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.
एकूण जागा १३ जागांसाठी, पुरूष- ७ जागा तर महिला-६ जागांसाठी निवडणूक होणार आहे.