वांगी-2 येथील अजिंक्य तकिकची नवोदय साठी निवड



चिखलठाण, दि. 23 (करमाळा-LIVE)-
वांगी-2 येथील अजिंक्य नितीन तकीक याची जवहर नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झाली आहे.
नवोदय साठी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी अजिंक्य तकीक याने एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या नवोदय प्रवेश परिक्षेत उत्तम गुण मिळवून नवोदय विद्यालय पोखपूर येथील प्रवेशासाठी पात्र ठरला आहे.
त्याला गुरव सर तुरंबे, मांडवे येथील सुतार मॅडम व साळुंके सर यांचे मार्गदर्शन लाभले अगोदर त्याने या अगोदर स्काॉलरशीप, सैनिक स्कूल ए.टी.एस. परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद शाळेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक सुधाकर पोपळघट, शिक्षक सतीश बोराडे, दादा बोराटे, शिवाजी भानवसे, मनिषा आदलिंग, सुहास गुळवे, सुरेश राऊत, फौजमल पाखरे, स्वाती पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. त्याच्या या यशाबद्दल राज्य साखर संघाच्या संचालीका रश्मी बागल, कृषी अधिकारी पवार साहेब, कृषी सहाय्यक राजेंद्र महाडीक, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास सातव, अशोक आप्पा तकिक, दिलीप ढाणे, गायकवाड गुरूजी, रामभाऊ चौधरी जयेश तकीक, सतिश तकीक यांनी अभिनंदन केले.
