08/06/2025

जेऊरच्या भारत हायस्कूलची सृजन घाडगे व उदय पाटील यांची नवोदय साठी निवड

0
IMG_20230623_100526.jpg

जेऊर, दि. 23 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत हायस्कूल मधील विद्यार्थी सृजन सोमनाथ घाडगे व उदय किरण पाटील यांची जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झाली आहे.

एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेत सृजन घाडगे हीचा जिल्हा यादीत पाचवा क्रमांक आला असून उदय पाटील याचा एकसष्ठ वा क्रमांक आलेला आहे.

कु. सृजन ही जेऊर ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ बापू घाडगे यांची कन्या असून चि. उदय हा बोरगावं चे सरपंच किरण पाटील यांचे सुपुत्र आहेत.

या निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिल गादिया, सचिव प्रा. अर्जून सरक, संस्था पदाधिकारी, प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य एन.डी कांबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page