जेऊर मधील व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील- भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे
जेऊर, दि. 26 (करमाळा-LIVE)-
जेऊर मधील व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोदी @9 जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी जेऊर येथे भुषण लुंकड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी जेऊर येथील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन काही अडचणी श्री चिवटे यांच्या समोर मांडल्या या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत माजी सदस्य विनोद गरड, माजी ग्रामपंचायत सदस्य मुबारक फकीर, सराफ संघटनेचे अध्यक्ष अमोल महामुनी, प्रवासी संघटनेचे व नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी, प्रतिष्ठित व्यापारी प्रवीण अशोक माळवे, अतुल घाडगे, भूषण लुंकड, रवी माळवे, गणेश अमृळे, नितीन मंडलेचा, प्रविण करे, बाबू महामूनी, दत्ता मारकड, नितीन घोडके, अक्षय किरवे, गैनवार पेंटर, शेख साहेब, ओंकार वेदपाठक व जेऊर येथील नागरिक उपस्थित होते.