08/06/2025

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वाढले, लाभार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा- सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर

0
20220519_081730.jpg
शिवम प्राईड, शेलगावं

करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-
महाराष्ट्र राज्य सरकार ने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान दरमहा रुपये 1000/- वरून 1500/-रुपये केले असल्याची माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती चे माजी अध्यक्ष तथा करमाळा बाजार समितीचे सभापती प्रा शिवाजी बंडगर यांनी दिली.

या बाबत बोलताना बंडगर म्हणाले की, गेली अनेक वर्षे संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या गोर-गरीब, निराधार, विधवा, परीतक्ता महिला, वृद्ध आदींना रूपये दरमहा 1000/- इतके मिळत आहे. या अनुदानात वाढ करण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. आपण अध्यक्ष असताना आम्ही ही अनेकदा सरकार कडे केली होती. याचा सारासार विचार करून शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात या बाबत निर्णय केला होता. परंतु अद्याप अंमलबजावणी केलेली नव्हती.

5 जुलै रोजी अंमलबजावणी बाबत चा शासनादेश जारी केला असून जुलै 2023 पासून याची सुरूवात करण्यात येणार आहे.

यावेळी श्री बंडगर पुढे म्हणाले की, संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत येणार्या सर्व योजना म्हणजे सं गा योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आदि सर्व योजनांसाठी देखील ही 500 रुपयाची वाढ आहे.

करमाळा तालुक्यातील सुमारे नऊ हजार लाभार्थ्यांना याचा लाभ होणार असून तालुक्यात दरमहा आता पूर्वीपेक्षा साडचार लाख रुपये जादा येणार आहेत.

या वाढीमुळे संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page