UPSC & MPSC : गुणवंतांचा उद्या जेऊर येथे सन्मान सोहळा


जेऊर, दि. 9 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जून सरक यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना प्रा. सरक यांनी सांगितले की, माजी आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे डिवायएसपी अजित पाटील (केंद्रीय गृहमंत्री पदक विजेते पोलिस अधिकारी) यांच्या हस्ते सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होणार आहेत.
यासाठी आयएएस अधिकारी शुभांगी पोटे (शेलगाव-वांगी), आयएफएस अधिकारी तुषार शिंदे (कंदर), पीएसआय अमित लबडे (शेटफळ), पीएसआय निखील सरडे (चिखलठाण), पीएसआय सागर पवार (सरफडोह), पीएसआय श्रीकांत गोडगे (पुर्व सोगाव), पीएसआय ओंकार धेंडे (जिंती), पीएसआय दत्तात्रय मिसाळ (कोर्टी), पीएसआय अभिजित ढेरे (वीट), सोनाली हनपुडे (गौंडरे), पीएसआय विद्या कळसे (गुळसडी), पीएसआय पल्लवी मारकड (उमरड) या यशवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होणार आहेत. सदर कार्यक्रम उद्या सोमवारी दि 10 जूलै रोजी भारत महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी ठिक दोन वाजता संपन्न होणार असून या कार्यक्रमाला आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, कारखाना संचालक, शैक्षणिक संस्था पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, शिक्षक, प्राध्यापक आदिंना विशेष निमंत्रण दिले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारत महाविद्यालय तसेच माजी आमदार नारायण (आबा) पाटील कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने केले गेले आहे. तरी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी तसेच सुजाण नागरिक बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन सचिव प्रा अर्जून सरक यांनी केले. यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, भारत महाविद्यालय प्राचार्य डाॅ अनंतराव शिंगाडे, भारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य केशव दहिभाते, मा. आ. नारायण (आबा) पाटील मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा डाॅ संजय चौधरी उपस्थित होते.

