08/06/2025

दहा दिवसात श्री मकाई कारखान्याचे बिल देणार तर यावर्षी तीन लाख टन उसाचे गाळप करणार नूतन चेअरमन भांडवलकर यांची माहिती

0
IMG-20230713-WA0027.jpg

करमाळा, दि. 14 (करमाळा-LIVE)-
श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत उसाचे बिल दहा ते पंधरा दिवसात उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून येणाऱ्या हंगामात सुद्धा सक्षमपणे मकाई सहकारी साखर कारखाना उसाचे गाळप करील असा विश्वास मकाई कारखान्याची चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी व्यक्त केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वतीने भांडवलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वडगाव चे युवा नेते चंद्रकांत काळे, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, जयवंतराव युवा मंचचे अध्यक्ष जयराज चिवटे, सरपंच राजेंद्र मिरगळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री भांडवलकर म्हणाले की, बागल गटाचे नेते रश्मी बागल-कोलते, युवानेते दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याला रक्कम उपलब्ध होत असून लवकरच शेतकऱ्यांचा पैसा दिला जाणार आहे. कै दिगंबर बागल यांनी उभा केलेला मकाई कारखाना चालवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page