आज जेऊर बंद.! सकल जैन समाजाचे पोलीस स्टेशनला निवेदन- पाटील गटाचा बंद ला पाठिंबा

जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)-
कर्नाटकात झालेल्या जैन साधू हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज जेऊर येथील जैन बांधवांच्या वतीने जेऊर बंद करून निषेध करण्यात येणार आहे. दरम्यान या बंद ला माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी पाठिंबा दिलेला आहे.
कर्नाटकमध्ये परमपूज्य आचार्य श्री 108 कामकुमारनंदजी मुनिराज यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. या हत्येचा निषेध करण्यासाठी हा बंद पाळण्यात येणार आहे.
सकल जैन समाज बांधवाच्या वतीने आज सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. आज दुपारी वाजताच्या सुमारास जैन स्थानक येथून जैन समाजाच्यावतीने मुक मोर्चा काढून जेऊर आऊट पोस्टचे पोलीस उपनिरिक्षक श्री बंडगर साहेब यांना निवेदन देण्यात आले.



