गुळसडी : सोलापूर जिल्हा नियोजन समितीमधून करमाळा तालुक्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार- भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे



करमाळा, दि. 22 (करमाळा-LIVE)-
सोलापूर जिल्हा नियोजन समितीमधून करमाळा तालुक्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन करमाळा भाजपचे तालुकाध्यक्ष तथा DPDC सदस्य गणेश चिवटे यांनी केले आहे.
करमाळा तालुक्यातील गुळसडी येथे गणेश चिवटे यांच्या DPDC निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी तीन लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदर कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना श्री चिवटे म्हणाले की, सोलापूर जिल्हा नियोजन समिती मधून आज पर्यंत करमाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांसाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे, तसेच येणाऱ्या काळात जास्तीत जास्त निधी करमाळा तालुक्यासाठी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, गणेश महाडिक, विनोद महानवर, गुरसळीचे सरपंच प्रमोद भंडारे, माजी सरपंच समाधान यादव, उपसरपंच योगेश भंडारे, ग्रामपंचायत सदस्य महावीर कळसे, आदम शेख, नारायण भोसले, पोलीस पाटील धनंजय अडसूळ, माजी उपसरपंच नवनाथ यादव, माजी सरपंच अनंत यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी खंडागळे, बापू मोहोळकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती जाधव, सामाजिक कार्यकर्ते सतीश बागल, श्याम पडवळे, पप्पू बागल, राज भंडारे शुभम लोंढे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


