वांगी-2 : 2019 पासून करमाळा तालुका विकास कामांपासून वंचित झाला; 2024 ला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आमदार झालो तर या तालुक्याचं नंदनवन केल्याशिवाय मी राहणार नाही- माजी आमदार नारायण आबा पाटील



करमाळा, दि. 22 (करमाळा-LIVE)-
माझ्या आमदरकीच्या 2014 ते 2019 या कालावधीमध्ये करमाळा तालुक्यात साडेबाराशे कोटी रूपयांची भरघोस कामे केली परंतु 2019 पासून तालुका विकास कामांपासून वंचित झाला 2024 ला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मी जर आमदार झालो तर या तालुक्याचं नंदनवन केल्याशिवाय मी राहणार नाही, असे मत करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी वांगी-2 येथे व्यक्त केले.
काल शुक्रवारी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी वांगी नंबर 2 या ठिकाणी विविध विकास कामांची उद्घाटन केली, त्याचबरोबर वांगी-2 मधील कार्यकर्त्यांनी स्नेहभोजनाचा देखील कार्यक्रम आयोजित केला होता, त्याचा देखील त्यांनी आस्वाद घेतला.
यावेळी केमचे सरपंच अजित दादा तळेकर, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, जिल्हा परिषद सदस्य बिभिषण आवटे, धुळा भाऊ कोकरे, शेलगावचे सरपंच अमर ठोंबरे, मुंबई महापौर केसरी विजय गुटाळ, ऋषिकेश पाटील, विनोद गरड, कुगावंचे नूतन सरपंच सागर पोरे, पंचायत समिती माजी उपसभापती गणेश चौधरी, दत्ता देशमुख, विकास पाटील, गणेश पाटील, वैभव पाटील, पोपट सातव, भाऊ गोडसे, दहिगावंचे सरपंच संजय गलांडे, आप्पा लोखंडे, सुरेश नरूटे, सचिन साळुंखे,भाऊ तावसे, सोनू होनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

त्याचबरोबर वांगी- 2 चे सरपंच सतीश चौधरी, युवा नेते गणेश बापू जाधव, उपसरपंच बशीर पटेल, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनील ढावरे, युवा नेते बळणाथ रणसिंग, विशाल तकिक-पाटील, दादा माने, रविराज देशमुख, नामदेव महाडिक, महादेव तकिक, यशवंत तकिक, अशोक तकीक, अशोक खराडे, बापूराव खराडे, प्रदीप जगताप, बालाजी जाधव, नामदेव सपकाळ, गणेश भानवसे, हनुमंत भानवसे, उस्मान पटेल, बप्पा महाडिक, राजाभाऊ चौधरी, सचिन जाधव, नवनाथ जाधव, प्रवीण आबा जाधव, मारुती तकीक, धनाजी चौधरी, अमोल खराडे, आबा खराडे, अमोल सातव अनिल सातव, रमेश पन्हाळकर, सचिन चौरे, बापू पन्हाळकर, बापू तोडकर, नवा तोडकर, दादा सातव, विनोद ढाणे, अनिल देवकर, महेश गणगे, शंकर मोरे, भाऊ मोरे, सतीश कोथमीरे, वैभव देशमुख, राहुल रणसिंग, सचिन रणसिंग, राजेंद्र रणसिंग, तय्यब पटेल, सुहास चौरे ,नाना चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल तकिक-पाटील यांनी केले. तसेच अतुल पाटील, प्रा. अर्जून सरक,अजित दादा तळेकर आणि विकासरत्न माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे प्रमुख भाषण झाली.
त्याचबरोबर अजितदादा तळेकर यांनी देखील वांगी नं.2 साठी दहा लाख निधी देण्याचे सभेमध्ये जाहीर केले युवा नेते गणेश बापू जाधव यांनी आभार मानले.


