करमाळा : पोलीस गाडी 112 मुळे महिलेचा हरविलेला मोबाईल मिळाला वापस



करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-
हरविलेला मोबाईल तात्काळ मिळवून दिल्या बद्दल पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दिगी येथील कविता संदीप थोरात या महिला कर्जत ते करमाळा दरम्यान प्रवास करीत असताना त्यांचा मोबाईल नितीन प्रकाश दुरंदे यांच्या प्रवासी गाडीमध्ये चुकून विसरून गेला.
कविता थोरात यांनी तात्काळ पोलीस गाडी 112 काँस्टेबल आनंद पवार मेजार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर 7070993040 हा आहे असे सांगितले, दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरील नंबर वरून नितीन प्रकाश दुरंदे यांना संपर्क केला असता सदरील मोबाईल गाडीमध्ये असून तो मोबाईल वापस देण्यासाठी करमाळा येथे घेऊन येत आहे असे सांगितले. मोबाईल करमाळ्यात आल्यानंतर प्रवासी कविता थोरात यांना देण्यात आला.



