08/06/2025

राजुरी येथील श्री. राजेश्वर विद्यालयाचे जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत यश ; ग्रामस्थांकडून सन्मान

0
IMG-20230901-WA0006.jpg

करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील राजुरी येथील श्री. राजेश्वर विद्यालयातील १४ वर्ष वयोगटातील संघाने थ्रो बॉल स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम तर १७ वर्षे वयोगटातील संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने विद्यालय, ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने सर्व खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक शिक्षक मारुती साखरे यांच्या सत्कार करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर मिळवलेल्या यशाबद्दल व भविष्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हेतूने राजुरी ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा फेटा, नारळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, मिठाई वाटली त्याबरोबर सर्व खेळाडूंची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सर्व ग्रामस्थांनी खेळाडूंचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक झोळ सर, ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, राजुरी गावचे माजी सरपंच डॉ. अमोल दुरंदे, श्रीकांत साखरे, नवनाथ दुरंदे, दादा बापू साखरे, नवनाथ साखरे, रेवणनाथ बाप्पू साखरे, राजेंद्र भोसले, दीपक साखरे, धनंजय साखरे, रत्नाकर तळेकर, विजय गरड, जगन्नाथ सर, अमोल कोल्हे आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page