08/06/2025

जेऊरमध्ये पेटणार राजकीय फड ; ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील गट विरूद्ध शिंदे गटात होणार दुरंगी लढत?

0
IMG_20221108_082501-1.jpg

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-
गेल्या एक वर्षांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजलेला असून करमाळा तालुक्याची राजधानी आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेल्या जेऊर ग्रामपंचायतीची निवडणूकीसाठी आॕक्टोबर हीट मध्ये वातावरण पेटणार असून निवडणूक रंगतदार होणार आहे, त्यासाठी मोर्चेबांधणी सुरूवात झालेली असून गावातील चौक, टपरी, मोक्याच्या ठिकाणी चर्चा सुरू झालेल्या आहेत.

प्रत्येक निवडणूकी प्रमाणे या वर्षी होणारी ही निवडणूक बिनविरोध न होता दुरंगी होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झालेले आहे, या वर्षी मात्र ही पारंपरिक पाटील गट विरूद्ध बागल गटामध्ये होण्याची शक्यता कमी असून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या शिंदे गट आणि पाटील गटात ही निवडणूक निवडणूक होणार असून दोन्हीही गटातून उमेवारांची चाचपणी आतापासूनच सुरू असल्यामुळे बागल गट जेऊर ग्रामपंचायत निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे.

जेऊर हे 15 हजार लोकसंख्याचे गाव असून मध्य रेल्वेचे स्टेशन असल्यामुळे जवळजवळ 20 ते 25 गावे जेऊर गावाला जोडली गेलेली आहेत. मावळत्या ग्रामपंचायत मध्ये 15 सदस्य असलेल्या जेऊर ग्रामपंचायत वर शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांची सत्ता आहे. 1992 पासून म्हणजेच गेल्या 31 वर्षांपासून जेऊर ग्रामपंचायतवर माजी आमदार पाटील यांची एकहाती सत्ता आहे. जेऊर ग्रामपंचायत मध्ये सध्या सर्वच्या सर्व 15 सदस्य पाटील गटाचे असून मागील 2017 च्या निवडणूकीत बागल गटाचा दारूण पराभव झालेला होता.

गेल्या निवडणूकीत प्रथमच जनतेतून सरपंच निवड झाली होती संगिता साळवे ह्या सरपंच होत्या तर यावेळी ही जागा ओबीसी साठी राखीव आहे. 2017 निवडणूकीत ज्यांची निवडणूक लढविण्याची संधी हुकली ते या वर्षी आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून दोन्ही गटाच्या कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत.
जेऊर ग्रामपंचायत निवडणूक 15 सदस्यांसाठी होणार आहे यात 8 सदस्य महिला तर 7 सदस्य पुरूष आहेत. एकंदरीत पाहिले तर ही निवडणूक दुरंगी होणार हे जवळजवळ फिक्स झालेले असून दोन्हीही गटांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक –6 आॕक्टोबर 2023
नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृतीचा दिनांक सोमवार 16 आॕक्टोबर 2023 ते शुक्रवार 20 आॕक्टोबर 2023
अर्ज छाननी करण्याचा दिनांक : सोमवार 23 आॕक्टोबर 2023
नामनिर्देशक पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक : 25 आॕक्टोबर 2023 दुपारी 3 पर्यंत व त्याच दिवशी दुपारी 3 नंतर चिन्ह वाटप
आवश्यक असल्यास मतदान घेण्याचा दिनांक : 5 नोव्हेंबर 2023
मतमोजणी दिनांक : 6 नोव्हेंबर 2023

https://karmalalive.in/ex-mla-narayan-aba-patil-birthday/
https://karmalalive.in/mla-sanjay-mama-shinde-birthday-special/
https://karmalalive.in/mla-sanjaymama-shinde-jeur-2/
https://karmalalive.in/patil-gut-action-mode/
https://karmalalive.in/karmala-political-news-new-govt-maharashtra/
https://karmalalive.in/kkarmala-constituency-has-different-types-of-polit/
https://karmalalive.in/karmala-jeur-wangi-news/

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page