केत्तूर : तरूण तसेच महिला उमेदवारांना संधी दिल्यास बिनविरोध निवडणूकीस पाठिंबा- अॕड विकास जरांडे

केत्तूर, दि. 8 (करमाळा-LIVE)-
केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली असून गावातील तरुणांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले आहे. आत्ता पर्यंत केत्तूर गावाने एकी दाखवत केत्तूर नं-१ केत्तूर नं-२ हा उजनी जलाशायावरील पुल लोकवर्गणीतून केला असून सन १९९६ साली तेरा कोटी नाम जप यज्ञ आणि श्री किर्तेश्वर देवस्थान परिसर लोकसहभागातून सुशोभिकरणाची कामे व भव्य असा कलशारोहण कार्यक्रम यशस्वी करून दाखवला आहे.
सर्वांनी एकत्र येत लाख्खो रुपये खर्च करून सामाजिक कामे केले असताना गावाने ठरवल्यास येणारी निवडणूक ही बिनविरोध होईल परंतु नवीन उमेदवारांस त्यातल्या त्यात उच्च शिक्षित महिलांना संधी दिल्यास आपण बिनविरोध निवडणूकीस पाठिंबा देणार आहे असे शिवसेना तालुका उपप्रमुख व करमाळा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॕड विकास जरांडे यांनी सांगितले.
- करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान
- कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न
- भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न
- उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष
- करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला


