जेऊर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना नागरी सुविधा देण्यावर भर दिल्याने आजवरच्या सर्व निवडणुका जिंकल्या- माजी आमदार नारायण आबा पाटील

जेऊर, दि. 11 (करमाळा-LIVE)- जेऊर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारण न करता केवळ नागरिकांना सर्व नागरी सुविधा देण्यावर भर दिल्याने आजवरच्या सर्व निवडणुका जिंकल्या, यापुढील निवडणुकीत सुध्दा विजयी परंपरा कायम राहील, अशी खात्री माजी आमदार नारायण पाटील यांनी बोलून दाखवली.
श्री पाटील जेऊर येथील कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. जेऊर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून 16 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणुकीची तयारी व विचारविनिमय करण्यासाठी पाटील गटाकडून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. येथील स्व. मोतिकाका गादिया सभागृहात ही बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यापारी पोपटशेठ मंडलेचा हे होते तर व्यासपीठावर समाजसेवक तथा आनंद पतसंस्था संस्थापक चेअरमन डॉ सुभाष सुराणा, सभापती अतुल पाटील, रामलाल कोठारी, घाडगे भाऊसाहेब, हंबीराव चव्हाण, परेशकुमार दोशी, राजूशेठ राठोड, किशोर शेठ राठोड, सोसायटी चेअरमन राजाभाऊ जगताप, हनुमंत विटकर, महेश कांडेकर, रमेश भोसले, नवीन शेठ दोशी, बबनराव कोठावळे, प्रकाश निमगीरे, सचिन निमगीरे, विवेक दोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की जेऊर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केवळ या शहराचा विकास एवढे एकच उदिष्ट आजवर आपण नजरेसमोर ठवल्याने सलग तीस वर्ष जेऊरकरांनी या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्याची संधी मला व माझ्या सहकारी कार्यकर्त्यांना दिली. राजकारणाच्या पलिकडे जाऊन या गावाशी माझे एक ऋणानुबंध असलेले नाते आहे.तुमच्या विश्वास व प्रेम यामुळेच मी सरपंच ते आमदार हा प्रवास करू शकलो. जेऊर हे आज वीज,पाणी यासाठी स्वावलंबी शहर बनले आहे. गाव अंतर्गत सुविधेवर भर देऊन विकासकामे केली.अजून खूप कामे बाकी असून ती पूर्ण करण्यासाठी गावकरी या निवडणुकीत सुध्दा माझ्या विचारांचा पॅनल विजयी करतील असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला. यावेळी डॉ सुभाष सुराणा यांनीही मार्गदर्शन केले.
या निवडणुकीतून पृथ्वीराज पाटील यांना जनतेतून सरपंच या पदासाठी उभे केले पाहिजे अशी आग्रही मागणी डॉ सुभाष सुराणा यांनी केली. तसेच मागील विकासकामांचा आढावा मांडून येत्या निवडणुकीत सुध्दा हमखास विजय मिळणार असल्याचे सांगीतले. तर पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी थेट विद्यमान आमदार महोदयांना लक्ष करून केवळ विरोधासाठी साठी वितोध करत भविष्यातील निवडणुकीसाठी आपले पोलिंग एजंट तयार व्हावेत या एकाच उद्देशाने विरोधी पॅनल तयार करण्याचे काम चालू असून त्यांच्याकडे जेऊर गावच्या विकासासाठी कसलाही अजेंडा नसल्याचे सांगितले. तसेच जे करमाळा मतदासंघांचा चार वर्ष झाली विकास करू शकले नाहीत ते जेऊर शहराचा विकास काय साधणार असा टोलाही तळेकर यांनी लगावला. सूत्रसंचलन ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड यांनी केले तर आभार सदस्य सुहास कांडेकर यांनी मानले.
या बैठकीस युवानेते पृथ्वीराज पाटील, मनसे नेते आनंद मोरे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जुनराव सरक, सरपंच भारत साळवे, माजी सरपंच भास्कर कांडेकर, राजूशेठ गादिया, उपसरपंच धनु शिरस्कर,दत्ता तळेकर, जालिंदर साळी सदस्य शांताराम सुतार, बापू घाडगे, संदीप कोठारी, शेरखान नदाफ, योगेश करनवर, मुबारक शेख, संतोष वाघमोडे, परमेश्वर पाटील, रफीक तांबोळी, सुनील कांबळे, मिरज पवळ, सोनाजी कसबे, धनु घोरपडे, सागर बादल, हनुमंत कांडेकर, तुषार किरवे, पोपट माने, उमेश मोहिते, अच्युत निमगीरे, संतोष पिसे, अण्णा पिसे, संतोष नुस्ते, राजू गरड, प्रशांत कुलकर्णी, उध्दव दूनाखे, मलंग शेख, शकील शेख, दादा मोहिते, दादा सुतार, प्राचार्य डॉ अनंत शिंगाडे, प्राचार्य दहीभाते, उपप्राचार्य कांबळे सर, एम टी पाटील सर, दळवी सर, पांडुरंग वाघमारे सर, सेवा निवृत्त गोडसे सर, बमा जाधव, हेळकर सर, प्रीतम चुंबळकर, पवन कोठारी, सुयोग दोशी, अर्जुन गायकवाड, दत्ता तळेकर, संजय साळी, बापू कावडे, संजू गुरव, गुलाब शेख, रसिक करे, सुहास सुर्यवंशी, सोमनाथ काशीद, कुदळे भाऊसाहेब, कांतीलाल लुनावत, पठाण साहेब, संजय कुमार भोसले, धोकटे बंधू, पिंटू माने, नितीन माने, सोमनाथ माने, उमेश माने, अनिल माने, दिलीप माने, विनोद ठोकळ यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तर कर्मयोगी गोविंद बापू पाटील पतसंस्था,लोकनेते नारायण(आबा)पाटील पतसंस्था, स्वामी विवेकानंद पतसंस्था, आनंद नागरी पतसंस्था, यंग मुस्लिम जमात, अतुल पाटील मित्रमंडळ, पृथ्वीराज पाटील यंग ग्रुप, नाभिक संघटना, जेऊर व्यापारी संघ, जैन संघ, जेऊर प्रवासी संघटना, हमाल संघ, छत्रपती शिवाजी महाराज जेऊर शहर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, मराठा सेवा संघ, बजरंग दल, बामसेफ, आर. पी. आय, जेऊर तालीम संघ, जेऊर विवीध विकास सोसायटी, समता परिषद, माळी संघ आदी संघटनेचे पदाधिकारी खास करून उपस्थित होते.
- नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कुंभेजच्या बागल विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सावडीचा वैभव ठोंबरे-पाटील झाला पोलीस उपनिरिक्षक
- ३६ विद्यार्थी आणि संशोधकांसह विविध क्षेत्रांतील १५ समाजदीपांचा रविवारी करमाळ्यात गौरव
- इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला मिळेल जागतिक व्यासपीठ- डॉ. प्रचिती पुंडे
- कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन


