शेटफळ येथे सामाजिक बांधिलकी ; वडीलांच्या स्मृतीदिना निमित्त गावातील गरजूंना केले उबदार ब्लॅंकेटचे वाटप


जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-
शेटफळ येथील गजेंद्र दिनकर पोळ यांनी आपल्या वडीलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त होणाऱ्या इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत गावातील गरजू 67 कुटुंबीयांना थंडीपासून बचावासाठी उबदार ब्लॅंकेटची भेट दिली असून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
श्री पोळ हे नोकरी निमित्त कुवेत देशात असतात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. स्वतः मिळेल ती कामे करून आपले शिक्षण पूर्ण केले वडिलांनी सालकरी म्हणून लोकांच्याकडे कामे केली. शिक्षणानंतर परदेशात नोकरीला गेले परंतु आपण ज्या परिस्थितीतून आलो परिस्थितीची त्यांना जाणीव ठेवत गावातील विविध धार्मिक व सामाजिक कार्याला ते नेहमी हातभार लावत असतात 19 नोव्हेंबर रोजी त्यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विठ्ठल पाटील महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम व महाप्रसाद अन्नदान करण्यात आले.
यावेळी गावातील वयोवृद्ध व गरजू विधवांना या कार्यक्रमाला सन्मानाने बोलवून त्यांना उबदार ब्लॅंकेट्सची दिवाळी भेट दिली आहे.
- महाराष्ट्र पक्षीमित्र, यशकल्याणी नेचर काँझर्वेशन व बागल विद्यालय कुंभेजचे ‘पक्षी वाचवा अभियान’- विद्यार्थ्यांनी उभारले १३७ पक्षी-पाणवठे
- महाराष्ट्र पक्षीमित्र, यशकल्याणी नेचर काँझर्वेशन व बागल विद्यालय कुंभेजचे ‘पक्षी वाचवा अभियान’- विद्यार्थ्यांनी उभारले १३७ पक्षी-पाणवठे
- राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्रा. बाळकृष्ण लावंड सन्मानित
- वन्यजीवांसाठी ‘जलदूत’ बनले सातव बंधू ; सौरभआणि माऊली यांच्याकडून वनक्षेत्रालगतच्या पाणवठ्यात नियमित पाणीपुरवठा
- जेऊरवाडी येथील योगेश निमगिरे यांचे आकस्मिक निधन ; जेऊर परिसरात शोककळा


