जेऊर व माढा येथे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील ; धैर्यशील मोहिते-पाटील


करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर व माढा रेल्वे स्थानकावर सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळविण्यासाठी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पत्र लिहून प्रवासी थांबण्याची मागणी केली आहे.
सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लोकांना सोयीचे असलेल्या जेऊर व माढा रेल्वे स्टेशनवर नेहमी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. पुणे येथे दररोज शाळा काॅलेजचे विद्यर्थी, व्यापारी, नोकरदार वर्ग व हाॅस्पीटल्स करीता ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोईकरता हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा आवश्यक आहे.
सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाल्यास या शहरातील व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल, तसेच शिक्षण व्यवसायांच्या दृष्टीने या शहरांच्या विकासाला चालना मिळेल. दळण वळणाच्या दृष्टीने हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा सोयीचा व गरजेचा असून रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाकडे पाठपुरवा करणार असल्याचे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले.
- कुंभेजच्या मातीतील रंगकलेचा दिल्लीत राष्ट्रीय कलाविष्कार ; चित्रकार निवास कन्हेरे यांची कला राजधानीतील प्रतिष्ठित त्रिवेणी कलादालनात
- स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने लोकसेवेच्या कार्याला नवी दिशा व बळ मिळते- युवानेते दिग्विजय बागल
- उठा उठा सकाळ झाली…! कार्यकर्त्यांनो, नेत्यांच्या सतरंज्या उचलण्याची वेळ झाली!
- करमाळ्याच्या राजकारणात युवा धुरंधर सक्रिय ; राजकीय आखाड्यात दुसऱ्या पिढीचे कारभारी
- कुंभेज फाटा येथे ‘धनलक्ष्मी स्टील ट्रेडर्स’चा दिमाखात शुभारंभ ; अक्कलकोटचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन


