08/06/2025

तालुकास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत पोफळज शाळेचे यश

0
IMG-20231208-WA0020.jpg

करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-
तालुका स्तरावरील टॅलेंट हंट स्पर्धेत पोफळज येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थीनींनी उज्ज्वल यश संपादन केले आहे

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने नुकत्याच प्राथमिक शाळेतील मुलांसाठी घेण्यात आलेल्या टॅलेंट हंट तालूकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद पोफळज शाळेतील विद्यार्थीनी चित्रकला विषयात अपर्णा परशुराम शिंदे व निबंध स्पर्धेत वैष्णवी प्रविण पवार या दोन विद्यार्थ्यांनींना यश मिळाले आहे.सुरवातीला केंद्रीय पातळीवर यश मिळवल्यानंतर त्यांची निवड तालुकास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोफळज येथील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, सरपंच ,उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page