पुनवर येथे संकल्प रथाला विरोध ; शेतकऱ्यांनी केला मोदी सरकार चा निषेध


करमाळा, दि. 27 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील पुनवर येथे भाजप सरकारच्या संकल्प रथाला ग्रामस्थांनी विरोध करून मोदी सरकार चा निषेध करण्यात आला.
भाजप सरकारचा संकल्प रथ आज पुनवर येथे दाखल झाला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी व सर्व मालाला हमीभाव मिळण्यासाठी सरकारचा जाहीर निषेध केला.
यावेळी एक मराठा लाख मराठा तसेच शेतकरी एकजूटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
गावातील सर्व शेतकरी व महिलांनी मिळून निषेध केला तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य हे उपस्थित होते व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

- करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान
- कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न
- भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न
- उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष
- करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला
