जेऊरच्या विनोद गरड यांची महाराष्ट्र हँडबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील विनोद गरड यांची महाराष्ट्र हँडबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
राजस्थान येथे होणाऱ्या ४३ व्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्रचा संघ सहभागी होणार असून ही स्पर्धा ९ ते १३ जानेवारी रोजी महावीर (श्री) राजस्थान येथे होणार आहेत.
दरम्यान महाराष्ट्राच्या प्रशिक्षक पदी विनोद गरड यांची निवड हँडबॉल असोसिएशनचे राज्य सचिव राजाराम राऊत यांनी केली आहे. जेऊर येथे झालेल्या स्पर्धेतून हा महाराष्ट्रचा संघ निवड केला आहे.
या निवडी बद्दल माजी आमदार नारायण पाटील, माजी सभापती अतुल पाटील, सरपंच पृथ्वीराज पाटील, उपसरपंच नागेश झांजुर्णे, प्रा.अर्जूनराव सरक, माजी सरपंच अनिल गादिया, नूतन हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष नुस्ते यांनी अभिनंदन केले आहे.
- करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान
- कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न
- भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न
- उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष
- करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला




