October 9, 2026

जेऊर येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

0
IMG-20240302-WA0060.jpg

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती जेऊर व पृथ्वीराज भैय्या पाटील मित्र मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूकी निमित्त जेऊर मुस्लिम समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य इक्बाल पठाण, माजी ग्रामपंचायत सदस्य मुबारक फकीर, ख्वाजासाहेब जहागिरदार, रमिज शेख, ॲड. शहानूर सय्यद, साजिद पठाण, रहेमान पठाण, हाजी.आरिफ शेख,आय्युब सय्यद, वाजिद मुल्ला, समीर शेख, आरिफ शेख, इम्रान पठाण, दगडु फकीर, जहांगिर शेख (कोंढेजकर) आदी उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page