08/06/2025

बार्शी तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद- जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड

0
IMG-20240308-WA0035.jpg

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-

बार्शी तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड यांनी व्यक्त केले आहे.

बार्शी येथे नुकताच सहविचार सभा पार पडली यावेळी शिक्षकांशी साधला संवाद साधण्यात आला.

पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष प्रा. लावंड म्हणाले की, बार्शी तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशनच्या वतीने राबविले जाणारे विद्यार्थी केंद्रित उपक्रम अनुकरणीय असून इंग्रजी भाषा शिक्षकांच्या परिश्रमामुळे बार्शी तालुक्यातील इंग्रजी विषयाचा गुणवत्तेचा आलेख उंचावला आहे. यावेळी जिल्हा असोसिएशनचे सचिव धनाजी राऊत, बार्शी इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास चौधरी, असोसिएशनचे उपाध्यक्ष शिनगारे सर, सचिव सुरेश राऊत व सदस्य उपस्थित होते.

हविचार सभेमध्ये जिल्हा कार्यकारिणीची पुढील दिशा व जिल्हास्तरीय राबविण्यात येणारे संभाव्य उपक्रम याबाबत चर्चा झाली. तसेच नविन शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण कल्पना प्रभावीपणे राबविण्यावर ये भर देण्यात येईल अशी ग्वाही प्रा. लावंड यांनी दिली व उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वसमावेशकता यासाठी सर्वांनी सक्रीय व्हावे असे आवाहन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.लावंड करमाळा इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. कल्याणराव साळुंके, सचिव प्रा.गोपाळराव तकीक, इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.सुखदेव गिलबिले यांचा बार्शी तालुक्याच्या वतीने प्रा. चौधरी, प्रा. शिनगारे, प्रा. राऊत यांनी सन्मान केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page