08/06/2025

करमाळ्यात माजी आमदार कै. अण्णासाहेब जगताप यांच्या जयंती निमित्त अभिवादन

0
IMG-20240310-WA0046.jpg

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्याचे माजी आमदार तसेच माजी नगराध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब जगताप हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याचे कार्य आपल्या आयुष्यात केले अशा या अष्टपैलू, व्यक्तिमत्त्वाचे आज जयंती दिनाचे औचित्य साधून त्यांचे आचार विचार आत्मसात करणे खरे गरजेचे आहे तेव्हाच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल अशी भावनिक आवाहन भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा माजी सरचिटणीस तथा माजी नगरसेवक किरण बोकन यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले.

श्री बोकन पुढे बोलताना म्हणाले की, एकेकाळचे माजी आमदार कै. अण्णासाहेब जगताप हे यांनी करमाळा तालुक्याचा विकास केला अशा या विकासाभिमुख कार्यकर्त्याला तालुक्यातील जनता कधीही विसरणार नाही असे बोकन बोलताना म्हणाले.

यावेळी दीपक चव्हाण, अंगद देवकते, पत्रकार जयंत दळवी यांनी देखील आपले विचार मांडले शेवटी आभार आदित्य जगताप यांनी मांडले.

माजी आमदार कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांच्या जयंतीदिनानिमित्त करमाळा शहरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा शहराध्यक्ष अॕड शिवराज जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा तालुकाघ्यक्ष आदित्य जगताप, युवराज चिवटे, अमोल शेळके, नागेश राखुंडे, अल्पसंख्यांक सेल करमाळा शहराध्यक्ष राजू सय्यद, समता परिषद कार्याध्यक्ष मधुकर भुजबळ, भाजपचे प्रदेश कार्यसमिती सदस्य दीपक चव्हाण, पत्रकार जयंत दळवी, पत्रकार विशाल परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष आजाद शेख, भीमराव राखुंडे, रासपा जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, अविनाश वाघमारे, भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकूर, अलीम शेख, अनुसूचित जाती मोर्च्याचे निकिल मोरे, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष शितोळे, भाजप उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा शहर सरचिटणीस जावेद शेख, पप्पू शेख, समीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शहर खजिनदार अरुण तांगडे, आनंद जगदाळे, गानबोटे सोमनाथ, आय काँग्रेसचे फारूक कुरेशी, संतोष ननवरे, रमजान मदारी, शिवसेना ठाकरे गटाचे विष्णू जाधव, युवासेना ठाकरे गटाचे कृष्णा बोराडे आधी जण उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page