क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती : जेऊर येथे आज भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन


जेऊर, दि. ११ (करमाळा-LIVE)-
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने जेऊर येथे आज ११ एप्रिलला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
जेऊर येथील सकल माळी समाजाच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार असून आज गुरूवारी सकाळी १०.०० वाजता महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून रक्तदान शिबीर होणार आहे. रक्तदान शिबीर बाजारतळातील कर्मयोगी गोविंदबापू पाटील सभागृहात होणार असून शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन सकल माळी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.




