जिल्ह्यात सर्वत्र इंग्लिश टिचर्स असोसिएशनच्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करू- डेल्टासचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.आगतराव भोसले


करमाळा, दि. १२ (करमाळा-LIVE)-
पंढरपूरसह लगतच्या तालुक्यात इंग्लिश टिचर्स असोसिएशनच्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करू असे मत डेल्टासचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.आगतराव भोसले यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशनच्या वतीने नूतन जिल्हा अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हयातील सर्व तालुक्यांत संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
असोसिएशनचे जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची पंढरपूर येथे सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी प्रा. आगतराव भोसले मनोगत व्यक्त करत होते. यावेळी डिस्ट्रिक्ट इंग्लिश टीचर्स असोसिएशन सोलापूर (डेल्टास) नूतन अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड , मार्गदर्शक प्रा. गुरुनाथ मुचंडे, इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे करमाळा तालुका अध्यक्ष प्रा. कल्याणराव साळुंके, प्रा. नितीन कुंभार, प्रा. दादा कोळी, प्रा.भजनदास वाघमारे , इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे सचिव प्रा. गोपाळराव तकिक, प्रा. पुरुषोत्तम माने, प्रा. बापूराव गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख प्रा. सुखदेव गिलबिले, प्रा. विजयराव खाडे इ. पदाधिकाऱ्यांसह इंग्रजी विषय शिक्षक उपस्थित होते.
यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड म्हणाले की, या पुढील काळात विद्यार्थी गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी प्रा. गणेश करे- पाटील यांच्या यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने स्पर्धात्मक वातावरण निर्माण केले जाईल. इंग्रजी लेखन, भाषण व संभाषण असे विद्यार्थी केंद्रित विविध उपक्रम राबवले जातील यासाठी सर्वांनी एकत्रीत प्रयत्न केल्यास संभाव्य अडचणी दूर होतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा. गुरुनाथ मुचंडे, प्रा. कल्याणराव साळुंके, प्रा.सुखदेव गिलबिले, प्रा. विजयकुमार खाडे यांनी मनोगते व्यक्त केली. या सहविचार सभेवेळी पंढरपूर तालुक्याचे वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रा.आगतराव भोसले यांनी नूतन जिल्हाध्यक्ष प्रा.लावंड यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.




