07/06/2025

माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष प्रवेशाची तयारी पूर्ण- शुक्रवारी करणार प्रवेश

0
IMG-20240424-WA0031.jpg

करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)- माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या तयारी साठीची बैठक पार पडली असून दि. २६ एप्रिल रोजी करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे.

याबाबत आज पाटील गटातील प्रमुख कार्यकर्ते आणि विविध पदांवर कार्यरत असलेले आजी माजी पदाधिकारी यांची एक संयूक्त बैठक जेऊर ता. करमाळा येथे पार पडली. बैठकीस करमाळा तालुक्यातील तसेच माढा तालुक्यातील छत्तीस गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. व्यासपीठावर माजी आमदार नारायण आबा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, शिक्षण महर्षी प्राचार्य जयप्रकाश बिले सर, सुखलाल लुणावत वकील, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक नवनाथ शिंदे, बापुराव देशमुख, रवि बुआ कोकरे, बाजार समिती माजी संचालक रणसिंग बापू, देवानंद बागल, सभापती अतुल पाटील, जि प सदस्य बिभीषण आवटे, अमरजितसिंह साळुंके, डाॅ अमोल‌ घाडगे-पाटील, महेंद्र पाटील, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जुनराव सरक, माजी जि प सदस्य चंद्रप्रकाश दराडे, बाजार समिती माजी संचालक पंडीत वळेकर, कंदर सरपंच मौलासाहेब मुलाणी, रोपळे माजी सरपंच तात्या गोडगे, उपळवाटेचे हर्षल‌ वाघमारे, म्हैसगावचे दयावान अतुल पाटील, भास्कर कांडेकर, अनिलकुमार गादिया, उपसरपंच नागेश झांजुर्णे, धनंजय शिरस्कर, बबन‌ घागडे, शेलगाव‌ सरपंच अमर‌ ठोंबरे, तसेच विविध पदांवर काम करणारी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

देवानंद बागल यांनी २६ तारखेच्या सभेबद्दल माहिती देताना सांगितले की माढा लोकसभा मतदारसंघातील‌ महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी देशाचे माजी संरक्षणमंत्री तथा कृषीमंत्री शरद पवार साहेब हे स्वतः करमाळा येथे हजर राहणार आहेत. दि २६ रोजी सकाळी दहा वाजता या सभेचे नियोजन केले असून कार्यकर्त्यानी आज उद्या आपल्या गावात बैठक घेऊन या सभेसाठी मोठ्या प्रमाणात मतदार हजर राहतील यासाठी नियोजन करण्याचे आवाहन देवानंद बागल यांनी केले.

प्रास्ताविक प्रा अर्जुनराव सरक यांनी केले तर यावेळी पवार सर, सुखलाल लुणावत, देवानंद बागल, बिभीषण आवटे, राजाभाऊ कदम, डाॅ अमोल घाडगे, रविंद्र कोकरे, अतुल पाटील, अनिरुद्ध कांबळे आदिंनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वांगी सहकारी सोसायटीचे नूतन चेअरमन श्री रविराज देशमुख व व्हाईस चेअरमन साधना नागनाथ मंगवडे यांचा सन्मान श्री पाटील व उपस्थिताच्यां हस्ते करण्यात आला.

सुत्रसंचलन माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड यांनी केले तर आभार ग्रा.प सदस्य उमेश‌ कांडेकर यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page