08/06/2025

चिखलठाण-जेऊर रस्त्याबाबत आमदार शिंदे गटाकडून पुरावा देत स्पष्टीकरण

0
images-63-1.jpeg

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)-
माढा लोकसभा निवडणुकीचे भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचार सभेदरम्यान चिखलठाण येथे नागरिकांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन केले होते.

त्यावर आमदार संजयमामा शिंदे यांनी हा रस्ता मंजूर झाला असून आचारसंहितेनंतर मार्गी लागेल असे स्पष्ट केले होते. परंतु तरीही सभा झाल्यानंतर खासदार निंबाळकर यांना घेरण्याचाही प्रयत्न करत ‘काम नाही तर मत नाही, अशी घोषणा देण्यात आली होती.’ त्यानंतर सोशल मिडियावर याबाबत उलट सुलट चर्चा रंगली होती.

आता मात्र आमदार शिंदे यांचे समर्थक चंद्रकांतकाका सरडे यांचेकडून टेंडर प्रक्रियेचा पुरावा सादर करत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे म्हणाले, हा रस्ता होणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी या भागातील सर्व ग्रामपंचायीतने ठराव देखील दिले होते. मी सरपंच असताना आमदार शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर आमदार शिंदे यांनी निधीही उपलब्ध करून दिला. त्यात काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यानंतर काही ठिकाणी कामही झाले. राहिलेले कामही पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही सर्व कटिबध्द आहोत. राहिलेले काम करण्यासाठी टेंडर प्रक्रियाही सुरु आहे. मात्र आचारसंहितेमुळे हे काम करण्यास अडचणी आल्या. शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय काम सुरु करता येत नाही, नागरिकांचा प्रश्न महत्वाचा आहेच. मात्र काही गोष्टी समजूनही घेणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण झाल्याशिवाय आम्हीही स्वस्थ बसणार नाहीत, कारण याच रस्त्याने आम्हालाही ये- जा करावी लागते. त्यामुळे कोणीही कसलाही गैरसमज करून टीका टिपणी करून नये, असे आवाहन सरडे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page