08/06/2025

महिलेवर अत्याचार प्रकरणी केम येथील एकास जामीन मंजूर

0
IMG-20221210-WA0012-2-2-1-1.jpg

सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील, अॕड राम नीळ यांनी काम पाहिले.

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-
महिलेवर अत्याचार प्रकरणी केम येथील एकास जामीन मंजूर झाला आहे.

यात हकीकत अशी की, केम येथील आरोपी आनंद राजेंद्र धोत्रे यांच्याविरुद्ध करमाळा पोलीस स्टेशन येथे भादवी 452 376( 2) ( f)354 354 (a)354(b)506 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी आनंद धोत्रे यास दिनांक 22/02/ 2024 रोजी अटक करण्यात आली होती.

तदनंतर त्याने जमीन मिळणे कामी अॕड निखिल पाटील यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालय येथे धाव घेतली होती सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री एल .एस.चव्हाण यांच्यासमोर झाली सदर जामीन अर्जाची सुनावणी वेळी आरोपीचे वकील अॕड निखिल पाटील यांनी यातील आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये पूर्वीपासून वाद आहे तसेच फिर्यादीच्या पतीविरुद्ध आरोपीने त्याचे वर हल्ला केल्या बाबतची फिर्याद यापूर्वीच दाखल झालेली होती व त्याचा बदला घेण्यासाठी सदरची खोटी फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे असा युक्तिवाद केला तसेच या केसचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र मेहरबान कोर्टात दाखल करण्यात आलेले आहे यापुढे आरोपीची तपास कामासाठी आवश्यकता नसून त्यास जामिनावर मुक्त करण्यात यावे असा युक्तिवाद केला.

सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी आनंद राजेंद्र धोत्रे वय 19 राहणार केम तालुका करमाळा यास जामिनावर मुक्त करण्यात आले.

सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील, अॕड राम नीळ यांनी काम पाहिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page