जेऊरच्या नवभारत स्कूलच्या विद्यार्थ्यांची जेऊर ते दहिगावं बाल दिंडी

चिखलठाण, दि. १५ (करमाळा-LIVE)–
जेऊर येथील नवभारत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जेऊर ते दहिगावं अशी बाल दिंडी उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील नवभारत इंग्लिश स्कूलच्या वतीने बाल विद्यार्थी वारकऱ्यांची दिंडी जेऊर वरून दहिगावं येथे गेली विठ्ठल रुक्मिणी विविध संत व वारकऱ्यांच्या वेशभूषेत असणाऱ्या या दिंडीचे ठिकठिकाणी ग्रामस्थ व पालकांनी स्वागत केले गावातील महिलांनी पालखीचे पूजन करून विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभाग नोंदवला.
गावातील विठ्ठल मंदिरात दिंडीचे प्रस्थान झाल्यानंतर फटाक्याच्या आतिषबाजीत मध्ये स्वागत करण्यात आले यावेळी फुगडी, हरिपाठ विविध अभंग गवळणी चे गायन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले ग्रामस्थांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या दिंडीमध्ये नवभारत स्कूलच्या विद्यार्थी शिक्षक व पालकांचा सहभाग होता.