06/06/2025

जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश ; यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान

0
IMG-20240715-WA0003.jpg

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)-
जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळविल्या बद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

सन २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये भारत प्रायमरी स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

इयत्ता पहिलीत शुभम नलवडे प्रथम तर श्रीयसी निमगिरे द्वितीय तर केंद्रा द्वितीय अमालिया सय्यद हीचा तिसरा क्रमांक आला आहे.

इयत्ता दुसरीत प्रद्युमन लबडे याचा केंद्रात प्रथम, गार्गी बाळासाहेब हीचा द्वितीय तर अनुष्का खाडे तृतीय क्रमांक, गौरी शिंदे हीचा चतुर्थ क्रमांक आला आहे. तसेच सभ्यवी शेंडगे हीचा जिल्ह्यात प्रथम अथर्व येवले याचा जिल्ह्यात दुसरा तर शिवानी साबळे राज्यात सहावी आली आहे.

इयत्ता तिसरीत निधी कुलकर्णी केंद्रात प्रथम, विरेन दोशी द्वितीय, स्वरा होगले तृतीय, यशकुमार राज चतुर्थ आला आहे तर नंदिनी जाधव केंद्रात पाचवी गौरी कर्चे केंद्रात सातवी, प्रभास माळवे केंद्रात आठवा तर हर्षदा म्हमाणे केंद्रात नववी आली आहे.

इयत्ता चौथीत अनन्या पाटील अनन्या केंद्रात प्रथम, नम्रता पवळ केंद्रात द्वितीय, स्वरा आवटे केंद्रात तृतीय, कुमारी अर्चना राज केंद्रात चतुर्थ सारंग जाधवर केंद्रात पाचवा, आरोही पाटील जिल्ह्यात चौथी आली आहे.

इयत्ता पाचवीत आर्या केकान केंद्रात प्रथम, प्रदिष्मा लबडे केंद्रात द्वितीय, कुमार अभिषेक राज केंद्रात तृतीय आला आहे.

इयत्ता सहावीत आदित्य बाळासाहेब केंद्रात प्रथम, वैभवी जगताप केंद्रात तृतीय, प्रांजली भिलारे केंद्रात पाचवा आला आहे.

इयत्ता सातवीत वैष्णवी गरदडे केंद्रात दुसरा वैष्णवी जगताप जिल्ह्यात पाचवी आली आहे.

वरील सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष माजी आमदार नारायण पाटील, उपाध्यक्ष अनिल गादिया, संचालक पृथ्वीराज पाटील, संस्थेचे सचिव अर्जुन सरक, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page