जेऊर येथील इरा पब्लिक स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

जेऊर, दि. २० (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील इरा पब्लिक स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा निमित्तानं शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी इंद्र दगडे याने गुरूंची वेशभुषा परिधान केली होती. यावेळी शिक्षिका मिश्रा मॅडम, चव्हाण मॅडम तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका अवसरे मॅडम व संस्थेचे सचिव सुनिल अवसरे यांनी गुरुपौर्णिमेविषयी चे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
तसेच इयत्ता पहिलीतील विद्यार्थी यज्ञेश किरण मारकड यानेही गुरूंना वंदन करणारे आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गशिक्षकांना विशेष शुभेच्छा दिल्या.