करमाळ्यात उद्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यालयाचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने १जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली असून त्याचे ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ऑगस्ट २०२४ अशी आहे. सदर अर्ज भरत असताना महिलांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावरती पर्याय म्हणून आमदार संजयमामा शिंदे यांचे पुढाकारातून तहसील कार्यालयाच्या आवारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे कार्यालय सुरू करण्यात येत असून या कार्यालयाकडून सदर योजनेचे ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज विनाशूल्क भरून दिले जाणार आहेत.
या कार्यालयाचे उद्घाटन उद्या दिनांक २२ जुलैला सकाळी ११ वाजता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते होणार असून यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी जाधव व उमेद अभियान चे श्री योगेश जगताप यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील महिलांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय करमाळा यांचे वतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील विविध गावातील अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन अर्ज भरले असतील व ते ऑनलाईन नोंदवायचे राहिले असतील तर असे अर्जही या कार्यालयात जमा केल्यास ते विनाशुल्क ऑनलाइन भरून दिले जाणार आहेत.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या या कार्यालयामुळे महिलांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही.