06/06/2025

स्व.लिलाताई दिवेकर यांचा स्मृती दिन : करमाळ्यात तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न

0
IMG-20240802-WA0035.jpg

करमाळा, दि. २ (करमाळा-LIVE)-
लोकशिक्षिका स्व.लिलाताई दिवेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त करमाळ्यात तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अपूर्वा पवार (गिरधरदास देवी विद्यालय), सान्वी पोळ (कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय), स्वरा कुलकर्णी (साडे हायस्कूल साडे) या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे प्रमुख सल्लागार प्रा. गणेश करे-पाटील यांचे मार्गदर्शन व आर्थिक सहकार्याने यशकल्याणी सेवाभावी संस्था, पंचायत समिती शिक्षण विभाग व करमाळा तालुका इंग्लिश टिचर्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी तीन गटामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत २१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी बार्शी तालुक्यातून परिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, शिक्षणविस्तार अधिकारी नितीन कदम, सोलापूर जिल्हा इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण लावंड, सचिव धनाजी राऊत, बार्शी पंचायत समितीचे विषयतज्ञ लक्ष्मी तोरड, करमाळा तालुका इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष कल्याणराव साळुंके, सचिव गोपाळराव तकिक, पंचायत समितीचे विषयतज्ञ रेवन्नाथ आदलिंग, मुख्याध्यापक नीळ सर आदी उपस्थित होते.

शालेय जीवनात मातृभाषेबरोबरच इंग्रजी संभाषण कौशल्य आत्मसात केल्यास भविष्यात विविध संधी निर्माण होऊ शकतात असे मत पारितोषिक वितरण प्रसंगी श्री नलवडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव गिलबीले यांनी तर आभार सहसचिव मारूती जाधव यांनी मानले.

स्पर्धेतील विजेते विद्यार्थी व शाळा पुढीलप्रमाणे

गट – पाचवी ते सहावी-

  1. प्रथम क्रमांक– स्वरा प्रवीण कुलकर्णी (साडे हायस्कूल साडे)
  2. द्वितीय क्रमांक- तेजस्वी सुरेश गव्हाणे (सुराणा हायस्कूल चिखलठाण)
  3. तृतीय क्रमांक- पारस नवनाथ भंडारे (जि.प. शाळा खंडागळेवस्ती)
  4. चतुर्थ क्रमांक– राजवीर अजिनाथ घाडगे (गुरुकुल पब्लिक स्कूल देवीचामाळ)
  5. पाचवा क्रमांक- शिवन्या संदीप ढेरे (छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल वीट)

गट- सातवी ते आठवी-

  1. प्रथम क्रमांक- सान्वी अतुल पोळ (कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय)
  2. द्वितीय क्रमांक- वैभव अरुण कोकरे (त्रिमूर्ती विद्यालय, टाकळी)
  3. तृतीय क्रमांक- संध्याराणी श्रीकृष्ण लबडे (ईरा पब्लिक स्कूल चिखलठाण)
  4. चतुर्थ क्रमांक- रझान शब्बिर आतार (कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय)
  5. पाचवा क्रमांक- वरद जयंत देशमुख (गुरुकुल पब्लिक स्कूल देवीचामाळ)
  6. उत्तेजनार्थ- अनन्या दत्तप्रसाद मंजरतकर (भारत हायस्कूल, जेऊर)

गट- नववी ते दहावी-

  1. प्रथम क्रमांक- अपूर्वा जनार्दन पवार (गिरधरदास देवी विद्यालय)
  2. द्वितीय क्रमांक- प्रगती किशोर चव्हाण (साडे हायस्कूल साडे)
  3. तृतीय क्रमांक- प्रांजली बाळकृष्ण लावंड (महात्मा गांधी विद्यालय)
  4. चतुर्थ क्रमांक- आरती अरुण कोकरे (त्रिमूर्ती विद्यालय टाकळी)
  5. पाचवा क्रमांक- आलिशा अस्लम शेख (श्री कमलादेवी कन्या विद्यालय)
  6. उतेजनार्थ- गिरिजा बाळकृष्ण टेके (श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, कोर्टी)

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page