जेऊर येथील सौ. किरण वळेकर विमा क्षेत्रातील सर्वोच्च असा MDRT २०२४ पुरस्काराने सन्मानीत


जेऊर, दि. २२ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील एलआयसी (LIC) चे मुख्य आयुर्विमा सल्लागार धनंजय वळेकर यांच्या पत्नी सौ किरण धनंजय वळेकर यांना एलआयसी (LIC) चा MDRT 2024 (मिलियन डाॅलर राऊंड टेबल) हा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

एलआयसी (LIC) चा MDRT 2024 (मिलियन डाॅलर राऊंड टेबल) हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सौ वळेकर यांना सलग चौथ्यांदा मिळालेला आहे. काल दि. २१ आॕगस्टला पुणे येथील हाॅटेल ग्रॅण्ड सेरेटाॅन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सन्मान करण्यात आला.
जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहचून एलआयसी (LIC) च्या योजनेचा लाभ कसा घेता येईल यावर आमचा सतत भर असतो, एलआयसीच्या माध्यमातून ग्राहकांना फायदा होईल याची आम्ही काळजी घेतो, पुढील काळातही जास्तीतजास्त कुटुंबीयांपर्यंत पोहचून एलआयसीचा लाभ मिळवून देणार आहे.
सौ किरण धनंजय वळेकर, विमा सल्लागार, जेऊर




- कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयाचा दहावीचा ९७.७२ टक्के निकाल
- कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयाचा दहावीचा ९७.७२ टक्के निकाल
- धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श
- ऑपरेशन सिंदूरमधील शहीद जवानांना श्रद्धांजली; करमाळ्यात आजी-माजी सैनिकांची भावनिक बैठक
- प्रज्ञाशोध परीक्षेत वांगी- ४ चा ओमराजे कारंडे तालुक्यात प्रथम

