07/06/2025

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलचे घवघवीत यश ; खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

0
IMG-20240830-WA0032.jpg

जेऊर, दि. ३१ (करमाळा-LIVE)-
जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत भारत हायस्कूलचे घवघवीत यश संपादन केले असून शाळेच्या नऊ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पुणे क्रीडा व युवक सेवा संचालन अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा आयोजित शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा सोलापूरातील कुमठे नाका येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या हॉल मध्ये नुकतीच पार पडली. या स्पर्धेत भारत हायस्कूलच्या १४, १७ आणि १९ वर्ष वयोगटातील खेळाडूंनी घवघवीत यश मिळविलेले आहे.

विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे-

१४ वर्षे वयोगट-

  1. बालाजी रमेश वाघमोडे
  2. चैतन्य गोकुळ पाटील
  3. संस्कृती धन्यकुमार गारूडी
  4. शिवानी सिध्देश्वर कुंभार

१७ वर्षे वयोगट-

  1. सुयश पांडुरंग चव्हाण
  2. अभा यशवंत व्हरे
  3. कार्तिकी विनोद जाधव

१९ वर्षे वयोगट-

  1. आदिती भिमराव सरक
  2. समृद्धी दिनकर उघडे

यशस्वी खेळाडूंना महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काटूळे, जिल्हा सचिव दिपक शिंदे, पवन भोसले, नारायण बोळगे, बाळासाहेब सरक यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिल गादिया, सचिव प्रा. अर्जून सरक, प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य एन.डी कांबळे, पर्यवेक्षक बी.एस शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page