जेऊरात ‘जय भवानी महिला मंडळच्या वतीने नवरात्र उत्सव उत्साहात साजरा ; दांडिया-गरबा चे आयोजन

जेऊर, दि. ११ (करमाळा-LIVE)-
जेऊर मध्ये सुतार नेट येथे ‘जय भवानी महिला मंडळच्या वतीने नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असून दांडिया-गरबा चे आयोजन करण्यात येत आहे.यावेळी नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी शक्तीच्या पूजा केल्या असून, ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून 12 ऑक्टोबरला सांगता होणार आहे.मनोभावे देवी मातेची पूजा, आराधना आणि साधना करण्यासोबत नऊ दिवस रास गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात येते. नवरात्रोत्सव काळात सर्वात आकर्षणाचा भाग म्हणजे गरबा आणि दांडिया. घागरा, चोळी आणि पारंपरिक दागिने परिधान करून अतिशय जल्लोषात आणि ऊर्जेने हे नृत्यप्रकार केले जातात. याचे आयोजन जय भवानी महिला मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.






