07/06/2025

अभिमानास्पद ! जेऊरच्या रणवीर घोरपडे ची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

0
IMG-20241011-WA0027.jpg

जेऊर, दि. १३ (करमाळा-LIVE)-
जेऊरकरांसाठी अभिमानास्पद बातमी असून जेऊरच्या रणवीर घोरपडे ची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झालेली आहे.

जेऊर येथील रहिवासी आणि पुणे येथे पोलीस दलात कार्यरत असलेले राहुल उर्फ नाना घोरपडे यांचे चिरंजीव रणवीर घोरपडे याची १४ वर्षे आतील गटात महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड झालेली आहे.

दि. १४ आॕक्टोबर ते २८ आॕक्टोबर दरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्यात त्याची निवड झालेली असून महाराष्ट्रातून तब्बल ३५० खेळाडूंमधून १५ खेळाडूंची निवड झालेली असून त्यात रणवीर याची निवड झालेली असून जेऊरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

या निवडीबद्दल गजराज क्रिकेट क्लब, जय भवानी मित्र मंडळ, छत्रपती शिवराय फाउंडेशन च्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page