तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत पोफळजच्या काव्यांजली पवार हीचे यश ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड



जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत करमाळा तालुक्यातील पोफळज येथील काव्यांजली प्रदीप पवार हीचा करमाळा तालुक्यात द्वितीय क्रमांक आलेला असून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
करमाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत इयत्ता पहिली ते पाचवी गटात पोफळज जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीची विद्यार्थ्यीनी काव्यांजली पवार हीचा करमाळा तालुक्यात द्वितीय क्रमांक आलेला आहे.
यासाठी कु. काव्या हिला वर्ग शिक्षक सय्यद सर यांचे मार्गदर्शन लाभले, तर तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.


- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

