तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पोफळजची आकांक्षा क्षीरसागर प्रथम ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड


जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत करमाळा तालुक्यातील पोफळज येथील आकांक्षा तानाजी क्षीरसागर हीचा करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक आलेला असून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
करमाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवी गटात पोफळज जिल्हा परिषदेची इयत्ता सातवीची विद्यार्थ्यीनी आकांक्षा क्षीरसागर हीचा करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक आलेला आहे.
यासाठी कु. आकांक्षा हिला वर्ग शिक्षक पठाण मॕडम यांचे मार्गदर्शन लाभले, तर तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.


- महाराष्ट्र पक्षीमित्र, यशकल्याणी नेचर काँझर्वेशन व बागल विद्यालय कुंभेजचे ‘पक्षी वाचवा अभियान’- विद्यार्थ्यांनी उभारले १३७ पक्षी-पाणवठे
- महाराष्ट्र पक्षीमित्र, यशकल्याणी नेचर काँझर्वेशन व बागल विद्यालय कुंभेजचे ‘पक्षी वाचवा अभियान’- विद्यार्थ्यांनी उभारले १३७ पक्षी-पाणवठे
- राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्रा. बाळकृष्ण लावंड सन्मानित
- वन्यजीवांसाठी ‘जलदूत’ बनले सातव बंधू ; सौरभआणि माऊली यांच्याकडून वनक्षेत्रालगतच्या पाणवठ्यात नियमित पाणीपुरवठा
- जेऊरवाडी येथील योगेश निमगिरे यांचे आकस्मिक निधन ; जेऊर परिसरात शोककळा


