पक्षाने संधी दिल्यास करमाळा विधानसभा लढविणार – गणेश कराड

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
भारतीय जनता पार्टीने करमाळा विधानसभेसाठी मला उमेदवारी द्यावी अशी मागणी ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव गणेश मोहन कराड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
उमेदवारी मिळण्याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय तसेच वरिष्ठां कडे मागणी केलेली आहे.
भारतीय जनता पार्टीने आजतागायत विधानसभेला मित्र पक्षाला जागा सोडलेली होती. भाजपाचे कार्यकर्त्यांनीही दरवेळेस निष्ठेने प्रामाणिकपणे काम करून युतीधर्म पाळला काही वेळे निवडून आले तर काही वेळेस चुरशीची लढत दिली. राज्यात २०१४ मध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि राज्यात तालुक्यामध्ये विकासाचे वारे वाहू लागले. त्यानंतर २०१९ रोजी महाराष्ट्रातील जनतेने युतीला स्पष्ट बहुमत दिले तर २०२४ च्या निवडणुकीमध्ये ही जनता पुन्हा एकदा महायुतीला स्पष्ट बहुमत तर देणारच आहे. राज्यात महायुती निर्णायक आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही.
केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्यामुळे केंद्राचा व राज्याचा निधी यामुळे मोठ्या प्रमाणात मतदार संघात विकास कामे झाली प्रचंड लोकहिताचे निर्णय झाले.विविध जाती समूहासाठी विविध महामंडळाची स्थापना करण्यात आली. अटल सेतू, समृद्धी मेट्रो, पालखी मार्ग पूर्णत्वास गेले तर काही प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहेत.
अशा प्रकारच्या दळणवळणाच्या साधनांमुळे विविध राष्ट्रीय महामार्ग खुले झाले आणि उद्योग व्यापार वृद्धी वाढली.
करमाळा तालुक्याच्या दृष्टीने रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा महत्वकांक्षी प्रकल्प केवळ भाजपाचे महायुती सरकारच पूर्ण करू शकते यामुळे ४० ते ६० गावे सिंचनाखाली येणार आहेत त्यामुळे हरित करमाळा तालुका अशी तालुक्याची नवीन ओळख होईल.
गोयेगाव अगोती येथील उजनी वरील पूल व केतुर पोमलवाडी चांडगाव उजनी वरील पूल करण्याचा संकल्प तसेच स्थापन झालेली विविध महामंडळाच्या माध्यमातुन भरघोस निधी देऊन विविध समाजातील युवकांना उद्योग व्यवसाय शिक्षण या क्षेत्रात भरीव मदत होणार आहे.
शासनाने अंगणवाडी सरपंच उपसरपंच यांचे मानधन असेल किंवा महिला बचत गट याबरोबरच पिक विमा अशा योजनाद्वारे शेतकरी तसेच ग्रामीण जनतेशी नेहमीच नाळ जोडलेली आहे.
भारतीय जनता पार्टीने मला संधी दिल्यास शेतकऱ्यांच्या हितांना प्राधान्य देऊन विविध सिंचन प्रकल्प मार्गी लावणे ऊस, केळी चे संशोधन करून उत्पादन वाढीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणे दुग्ध क्रांतीला प्रोत्साहन देणे उजनी परिसरामध्ये व्यवसायिक पर्यटन क्षेत्र विकसित करणे तालुक्यामध्ये कृषी महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, एमआयडीसीची उभारणी तसेच तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडून सोडण्यावर आपला भर राहील. तरी वरिष्ठांनी या गोष्टीचा विचार करून करमाळा विधानसभेची भाजपची उमेदवारी मला द्यावी अशी मागणी गणेश कराड यांनी केली आहे.