06/06/2025

दिग्विजय बागल यांच्या हाती पुन्हा धनुष्यबाण ; शिवसेना शिंदे गटात प्रवेश

0
IMG-20241029-WA0010.jpg

करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-
मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या एका बैठकीत त्यांनी अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश केला, आता करमाळा विधानसभा ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढणार आहेत.

दिग्विजय बागल हे करमाळा तालुक्यातील प्रभावी युवा नेते असून, महायुतीच्या नेत्यांच्या जवळ राहिल्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बागल यांचा जनसंपर्क मोठा आहे. तसेच मतदारांचा चांगला पाठिंबा मिळवत होते. बागल यांच्या शिंदे गटात प्रवेशामुळे करमाळा तालुक्यात आता शिवसेना शिंदे गट आणि
राष्ट्रवादी शरद पवार गट, अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्यात थेट सामना होणार आहे.

यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून,धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यामुळे बागल यांचे शिंदे गटात महत्त्व वाढणार असून एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता व त्यांनी आणलेल्या विविध योजनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना निवडणूकीत फायदा होणार असून त्यामुळे करमाळ्यात बागल यांचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.

याप्रवेशावेळी दिग्विजय बागल यांच्यासोबत मार्गदर्शक विलासराव घुमरे, मंगेश चिवटे, जिल्हाप्रमुख महेश चिवटे, मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, सतीश नीळ, राजेंद्र मोहोळकर, नंदू भोसले उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page