करमाळ्यात आज जाहीर सभा ; पाडव्याच्या मुहुर्तावर भाऊ-आबा यांची तोफ कडाडणार

करमाळा, दि. २ (करमाळा-LIVE)-
करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरूवात होत असून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नारायण पाटील यांची करमाळ्यात सभा होत असून माजी आमदार जयवंतराव जगताप आज पाडव्याच्या मुहुर्तावर काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार संजयमामा शिंदे यांची साथ सोडत माजी आमदार नारायण पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे.
आज २ नोव्हेंबर पासून प्रचाराला करमाळ्यातून सुरूवात होणार आहे. आज महात्मा गांधी विद्यालयात जाहीर सभा होणार आहे. या सभेला खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत.