07/06/2025

येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री करमाळ्यात ; दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ भव्य सभा

0
IMG-20241105-WA0007.jpg

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)-
महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबर बागल यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ८ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे येत असून दुपारी बारा वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांची भव्य सभा होणार असून या सभेला करमाळा विधानसभा मतदारसंघातील लाखो मतदारांनी व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी उपस्थित राहावे असे आव्हान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.

अत्यंत राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा विधानसभेसाठी दिग्विजय दिगंबरराव बागल यांना अधिकृत उमेदवारी दिली असून त्यांना निवडून आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद लावून निवडणूक प्रतिष्ठित केली आहे

याबाबत माहिती देताना जिल्हाप्रमुख चिवटे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी अकरा वाजता सोलापूर विमानतळावर येणार असून तेथून हेलिकॉप्टरने करमाळा येथे येणार आहेत त्यांची बारा वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार असून या सभेनंतर पुढे त्यांच्या परंडा बार्शी धाराशिव उमरगा अशा चार सभा आहेत

ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल, शिवसेनेचे समन्वयक विलासराव घुमरे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष सुयश करचे, शहरप्रमुख संजय शिलवंत, महिला आघाडी नेत्या पद्मजा इंगवले, उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे युवा, सेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, युवा सेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड, उपतालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे, बाळासाहेब वाघ, दादासाहेब तनपुरे, वैद्यकीय सहाय्यक दीपक पाटणे, नागेश चेंडगे, कुर्डूवाडी शहर प्रमुख समाधान दास, महिला आघाडी शहर प्रमुख कीर्ती स्वामी, रोहित बलाक्षी सागर कोल्हे अनिता पवार आदी पदाधिकारी यांच्याबरोबर आरपीआय रयत शेतकरी संघटना, अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page