07/06/2025

नारायण आबांना निवडून द्या ; रिटेवाडी, बेंध ओढ्या सारखी प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावू- पवार साहेबांचे करमाळ्यात अभिवचन

0
IMG-20241117-WA0039.jpg

करमाळा, दि. १७ (करमाळा-LIVE)-
करमाळा- माढा मतदारसंघातील रिटेवाडी, बेंध ओढ्या सारखी सर्व प्रलंबित कामे मार्गी लावू, शेतकऱ्यांच्या विजेची कामे असतील, पाण्यासंधर्भातील कामे असतील निवडणुकीनंतर मी स्वतः लक्ष घालून मार्गी लावतो, तुम्ही फक्त महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना साथ द्यावी असे जाहीर आवाहन करमाळा येथील झालेल्या विराट सभेत राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे सर्वेसर्वा पवार साहेबांनी केले.

आज दिनांक 17 रोजी करमाळा येथे आयोजित केलेल्या विराट सभेत पवार साहेब बोलत होते. या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची व्हील चेअरवर एन्ट्री होताच उपस्थित सर्वांनी टाळ्या आणि शिट्यांचा वर्षाव करून उत्स्फर्तपणे दादांना अभिवादन केले. सकाळी अभेच्या आगोदर पवार साहेबांनी मुस्लिम नेते उस्मानशेठ तांबोळी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी नगरसेवक अल्ताफ तांबोळी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, सुभाष गुळवे, अतुल खूपसे, तालुकाध्यक्ष संतोष वारे व अन्य पदाधिकारी, नेते उपस्थित होते.

या सभेत पवार साहेबांच्या उपस्थितीत अनेक मोठ्या सामाजिक संघटनांनी आबांना साथ देण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला पाठिंबा जाहीर केला. यामध्ये, पाणी संघर्ष समिती कुर्डू विभाग – बालाजी जगताप, कल्याण चोपडे, सूरज भोसले, विष्णू जगताप, श्रीकांत गायकवाड, सत्यशोधक बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष – दत्ताभाऊ अल्हाट, भारत राष्ट्र समिती – अण्णासाहेब सुपणर, मी वडार महाराष्ट्राचा संघटना – सागर पवार, मदारी समाज – समशेर मदारी,
यापूर्वीचा अतुल खूपसे यांच्या जनहित संघटनेने ही पाठिंबा दिला आहे.

या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शरदचंद्र पवार साहेबां बरोबर जिल्ह्याचे नेते व माजी उपमख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, अहिल्यादेवी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, सुनील बापू सावंत, अॕड राहुल सावंत, राजेंद्रसिंह राजेभोसले माजी चेअरमन, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, आप्पासाहेब झांजुर्णे, नवनाथ झोळ, तालुका प्रमुख सुधाकर लावंड ,शहर प्रमुख प्रवीण कटारिया, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप, दलित नेते यशपाल कांबळे, भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण माने,महिला नेत्या सविताराजे भोसले, सभापती अतुल पाटील, राष्ट्रवादीचे पदाधिकारी रवी पाटील, मुस्लिम समाजाचे नेते उस्मान शेठ तांबोळी, अल्ताफ शेठ तांबोळी, शंभूराजे जगताप, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, श्रेणिक खाटीक, दादासाहेब लबडे, शहाजीराव देशमुख, किरण कवडे, संजय जाधव संचालक, शिवसेनेचे शाहू फरतडे, राजाभाऊ कदम, बिभिषण आवटे जिल्हा परिषद सदस्य, डॉ अमोल घाडगे, महादेव कामटे, उपसभापती दत्तात्रय सरडे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष नलिनी जाधव, तसेच एडवोकेट सविता शिंदे यांच्याबरोबर तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी नेते उपस्थित होते.

पवार साहेबांनी विकासकामांच्या मुद्यांबरोबरच अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्यावरही सडकून टीका करताना सांगितले की, मतदारसंघातील विकासकामांसाठी जेंव्हा जेंव्हा संजयमामा शिंदे माझ्याकडे आले, तेंव्हा तेंव्हा मी त्यांचे प्रश्न सोडवा असे सांगत होतो . मला वाटले की हे जनहिताची कामे घेऊन येतात मात्र ही कामे लोकांच्या विकासासाठी नसून त्यांच्या स्वतःच्या स्वार्था साठी होती हे लक्षात आले. यामुळे अशा माणसाला पराभूत करा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page