08/06/2025

बुध्दीबळ स्पर्धेत पोफळजची आकांक्षा क्षीरसागर करमाळा तालुक्यात प्रथम

0
IMG-20241220-WA0007.jpg

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)-
सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत नुकत्याच झालेल्या करमाळा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पोफळजची आकांक्षा क्षीरसागर तालुक्यात प्रथम आली आहे.

बुध्दीबळ स्पर्धेत पोफळज येथील जि. प शाळेची विद्यार्थिनी आकांक्षा तानाजी क्षीरसागर हिने मोठा गटातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कु. आकांक्षा हिला नियमित सराव घेत आदर्श शिक्षिका रेखा शिंदे-साळुंके मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी चिखलठाणच्या केंद्रप्रमुख वंदना पांडव यांनी आकांक्षाला रोख रकमेचे बक्षीस देऊन तिचा गौरव केला.

या यशाबद्दल करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील, विस्ताराधिकारी नितीन कदम, पोफळजचे सरपंच कल्याण पवार, माजी सरपंच दत्तात्रय गव्हाणे, उपसरपंच राणी गव्हाणे, व्यावसायिक बिभिषण गव्हाणे, चिखलठाण केंद्रप्रमुख वंदना पांडव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहूल धुमाळ, दत्तात्रय पवार, मारुती पवार, मेजर सचिन पवार, अरुण पवार, अक्षय कुलकर्णी, उत्तरेश्वर कांबळे, विस्ताराधिकारी मिनीनाथ टकले, माजी केंद्रप्रमुख भारत पांडव, केंद्र प्रमुख वैशाली महाजन, केंद्र प्रमुख रमाकांत गटकळ, जेऊरचे केंद्रप्रमुख लक्ष्मण भंडारे, केंद्रप्रमुख आदिनाथ देवकाते, केंद्रप्रमुख साईनाथ देवकर, केंद्रप्रमुख संजय मुंडे, सतीश चिंदे, विवेक पाथ्रुडकर यांनी अभिनंदन केले आहे.

पोफळज शाळेची गुणवत्ता चांगली असून सहशालेय उपक्रमतील विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग उल्लेखनीय असतो. केंद्रप्रमुख म्हणून शाळेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जाते.
वंदना भारत पांडव, (केंद्रप्रमुख, चिखलठाण केंद्र)

शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम घेत आहेत. पोफळज ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे मोलाचे सहकार्य मिळते त्यामुळे शाळेची प्रगती होत आहे.
मुमताज फकीर, (मुख्याध्यापिका जि. प शाळा पोफळज)

जिल्हा परिषदेच्या टॅलेंट हंटसह इतर स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील प्रज्ञा अधोरेखित होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून शैक्षणिक गुणवत्ता चांगली होण्यास मदत होत आहे .ग्रामस्थांच्या सहकार्याने विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात खेळाचे पुरेसे साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.
रेखा शिंदे-साळुंके (मार्गदर्शक शिक्षिका)

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page