शैक्षणिक चळवळ गतिमान करण्यासाठी उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन देणार- प्रा गणेश करे-पाटील

यशकल्याणी संस्थेच्या वतीने इंग्रजी भाषा शिक्षकांच्या पुणे अभ्यास दौऱ्याचे आयोजन
करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-
शैक्षणिक चळवळ गतिमान करण्यासाठी उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन देणार असल्याचे मत यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले आहे. यावेळी करमाळा तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशन व सदस्यांसह सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा सहभाग होता.
यशकल्याणी सेवाभावी संस्था व सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ५ जानेवारी रोजी पुणे येथे इंग्रजी भाषा शिक्षकांसाठी एक दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला असून यशकल्याणी संस्थेने या अभ्यास दौऱ्याचे आर्थिक बाबींसह संपूर्ण नियोजन केले आहे अशी माहिती यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश करे पाटील यांनी दिली आहे.
याअभ्यास दौऱ्यामध्ये महत्वपूर्ण व दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये परम पूज्य ऋषी डॉ.विश्वास मंडलिक गुरुजी यांचा योगिक जीवन आणि तणाव मुक्तीसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिक्षकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ व्हावा व विद्यार्थ्याना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवुन संशोधन क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने करमाळा तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळण्यासाठी याचा विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा यासाठी संस्था प्रयत्नशील आहे याचाच एक भाग म्हणून शिक्षकांसाठी पुणे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रा. करे-पाटील यांनी अनौपचारिक संवाद साधताना दिली.
जागतिक आयसर ह्या भारतीय विज्ञान संशोधन संस्थेस भेट व यावेळी प्रा अशोक रुपनेर यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स सेंटर आणि प्रोलक्स कंपनीस भेट देण्यात येणार असून यावेळी कंपनीच्या डायरेक्टर डॉ. प्रचीती पुंडे या वेलनेस रिडिफाईनड या विषयी मार्गदर्शन करणार आहेत तर प्रथितयश लेखक व व्याख्याते डॉ आशुतोष मिसाळ यांचे व्याख्यान होणार आहे.
एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अमृत करे पाटील हे त्यांच्या इम्यूनो सायन्स इंडिया या कंपनीने केलेल्या संशोधनाची माहिती देणार आहेत दरम्यान प्रसिद्ध गायक द्वयींच्या सांगीतिक कार्यक्रमाचाही आनंद घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.