जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील प्रवासी संघटनेच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांचा ट्राॕफी आणि मेडल देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जेष्ठ समाजसेवक डॉ सुभाष सुराणा, माजी सभापती अतुल पाटील, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, उपसरपंच नागेश झांजुर्णे, ग्रामपंचायत सदस्य संदिप कोठारी, सोलापूर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, अप्पासाहेब लबडे, दादासाहेब लबडे, जेष्ठ व्यापारी राजकुमार राठोड, आदी उपस्थित होते.
जेऊर येथील दहिगावं रोडवर असलेल्या इरा पब्लिक स्कूलमध्ये रेल्वे प्रवासी संघटनेकडून करमाळा तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नासीर कबीर, अशपाक सय्यद, शितलकुमार मोटे, विशाल घोलप,अशोक मुरूमकर, विशाल परदेशी, गजेंद्र पोळ, सुनिल भोसले, सचिन बिचितकर, जयंत दळवी, सिध्दार्थ वाघमारे, सुयोग झोळ, हर्षवर्धन गाडे, धर्मराज दळवे, प्रफुल्ल दामोदरे, नंदकुमार वालटे आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी, इरा पब्लिक स्कूलचे अध्यक्ष सुनिल अवसरे, माजी ग्रामपंचायत सदस्य मुबारक शेख, भूषण लुंकड, सुनील माने, बाबुराव अवसरे, महेश रणदिवे, प्रमोद जानकर, पोपट माने, सलीम पठाण, अल्लाउद्दीन मुलाणी, तात्यासाहेब कळसाईत, गणेश अमरुळे, हनुमंत कांडेकर, श्रीकृष्ण कांबळे, संजय क्षीरसागर, सोमनाथ काशिद, मनोज गोरे, कुलदीप जाधव, विशाल काळे, महादेव गुंड, उपस्थित होते.