26/02/2026

शिवसेना ओबीसी-व्हिजेएनटी सेनेच्या वतीने हिंदुहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

0
IMG-20250126-WA0056.jpg

सोलापूर, दि. २६ (करमाळा-LIVE)-
शिवसेनेचे पक्षप्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.

सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख सुयश कर्चे, शहरप्रमुख अभिजित काळे उपजिल्हाप्रमुख अंकुश कदम, करमाळा तालुकाप्रमुख रमेश लगस उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुयश कर्चे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वबद्दल चे विचार सांगितले तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ उपाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शना काम करणार असल्याचे सांगितले.

तसेच शहरप्रमुख अभिजित काळे, उपजिल्हाप्रमुख अंकुश कदम, तालुका प्रमुख रमेश लगस यांनीही आपले विचार व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page