08/06/2025

जेऊरची स्टेट बँक नावाला अन् पैसे नाहीत द्यायला ग्राहकांना- बँकेच्या काराभारावर ग्राहकांची प्रचंड नाराजी

0
IMG_20250201_182154.jpg

जेऊर, दि. १ (करमाळा-LIVE)-
जेऊरची स्टेट बँक नावाला अन् पैसे नाहीत द्यायला ग्राहकांना अशी गत झालेली असून जेऊर स्टेट बँकेच्या काराभारावर ग्राहकांची प्रचंड नाराजी असल्याचे चित्र दिसून आहे.

जेऊर येथे स्टेट बँक असून जेऊर परिसरातील जवळजवळ २० ते २५ गावांचा कारभार या बँकेत चालतो, हजारो ग्राहक या बँकेत असून बँकेतून ग्राहकांची हमेशा पिळवणूक होत आहे.

आज १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी देशाचा बजेट सादर केला परंतु जेऊर स्टेट बँकेच्या तिजोरी मात्र खडखडाट आहे. आज बँकेत गेलेल्या ९०% ग्राहकांना हात हलवत माघारी परतावे लागले. सकाळी गेलेल्या ग्राहकांना बँकेच्या तिजोरी मध्ये पैसे नाहीत दुपारी दोन नंतर या असे सांगण्यात आले, दोन नंतर गेल्यावर सोमवारी यावे असे उत्तर देण्यात आले. बँकेत पैसे नसल्यामुळे ग्राहक संभ्रमात पडलेले असून पैसे का मिळत नाही असा जाब विचाराल्यावर कर्मचाऱ्यांकडून उलट-सुलट उत्तरे मिळाली.

जेऊर स्टेट बँकेचे ब्रँच मॕनेजर संजय सिंह यांना मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे जेऊर स्टेट बँकेत चालले तरी काय आहे परिसरातील ग्राहकांना समजेना झाले असून वरिष्ठांनी याची दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page