कुंभेज येथे माजी राज्यमंत्री स्व. दिगंबररावजी बागल यांना अभिवादन

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)-
महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल मामा यांना स्मृतीदिनानिमित्त कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयात अभिवादन करण्यात आले.
स्व. मामांच्या 19 व्या स्मृतीदिनानिमित्त विद्यालयात कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांनी स्व. मामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. स्व. मामांच्या संघर्षमय राजकीय व सामाजिक जीवनप्रवासा बद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी शिक्षकवृंद यांनी स्व. मामांबद्दल आदरभाव व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम बनसोडे यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक हनुमंत पाटील , शिक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे. विष्णू पोळ, दादा जाधव,सेवक बलभीम वाघमारे, किशोर कदम, संतोष घोरपडे,नंदकुमार कांबळे उपस्थित होते.